घरलाईफस्टाईलपनीर - चीज सॅन्डविच

पनीर – चीज सॅन्डविच

Subscribe

झटपट पनीर - चीज सॅन्डविच

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘पनीर – चीज सॅन्डविच’ नक्की ट्राय करा.

साहित्य

- Advertisement -

एक वाटी पनीर
अर्धी वाटी किसलेले चीज
एक चमचा आले-लसूण-मिरची वाटून
पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ-मिरपूड
सात-आठ ब्रेडचे स्लाईस
पाव वाटी टोमॅटो सॉस
थोडे लोणी

कृती

- Advertisement -

ब्रेडच्या स्लाईसना एका बाजूने टोमॅटो सॉस लावावा. त्यानंतर पनीर कुस्करून घेऊन त्यात इतर साहित्य मिसळावे. नंतर निम्म्या ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण पसरून वर उरलेले स्लाईस लावून त्याचे सॅन्डविच तयार करावेत. नंतर बाहेरच्या बाजूने लोणी लावून नॉनस्टीक तव्यावर भाजावेत किंवा सॅन्डविच मेकर, ओव्हनमध्ये भाजावेत. अशाप्रकारे झटपट मस्त असे पनीर – चीज सॅन्डविच सॉससोबत सर्व्ह करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -