घरलाईफस्टाईलअशी घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी!

अशी घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी!

Subscribe

अशी घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी

सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, या पावसात त्वचेची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न पडतो. तसेच पावसाळ्यात हवेत मोठ्या प्रमाणात दमटपणा असल्याने त्वचा ओलसर देखील होते. त्यामुळे अशावेळी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी शरिराला खाज येण्यास सुरुवात होते. तर अनेक वेळा शरिराची आग देखील होते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.

कडूनिंबाची पाने

कडूनिंब हा त्वचेवर एक रामबाण उपाय आहे. पावसाळ्यात त्वचेला येणारी खाज असह्य होते. अशावेळी कडूनिंबाच्या पानांची पेस्ट खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो.

- Advertisement -

मेथीचे दाणे

पावसाळ्यात अनेकदा ओले कपडे अंगावर राहिल्यास त्या ठिकाणी खाज येते आणि त्या जागी आगआग होते. अशावेळी मेथीच्या दाण्याची पेस्ट करुन ती पेस्ट त्याठिकाणी लावल्यास त्वरित आराम मिळण्यास मदत होते.

कडूनिंबाचे पाणी

आंघोळ करताना पाण्यामध्ये कडूनिंबाची पाने घालून त्या उकळलेल्या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे त्वचेचे आजार होत नाहीत.

- Advertisement -

तिळाचे तेल

आंघोळ करण्यापूर्वी तिळाच्या तेलाने मसाज करावा. यामुळे त्वचा मुलायम आणि निस्तेज होण्यास मदत होते.

तुळस पेस्ट

तुळस ही औषधी असते. त्यामुळे त्वचेवर याचा चांगला फायदा होतो. यासाठी तुळस, कडूनिंब आणि पुदिन्याच्या पानांची पेस्ट एकत्र करुन लावल्यास त्वचे संबंधिच्या समस्या दूर होण्यास मदत होते.


हेही वाचा – तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन कॉफी पिणे फायद्याचे

हेही वाचा – पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -