घरताज्या घडामोडीहिवाळ्यातील स्पेशल रेसीपी - मटार करंजी

हिवाळ्यातील स्पेशल रेसीपी – मटार करंजी

Subscribe

सध्या बाजारात मटार मोठ्या प्रमाण उपलब्ध झाले आहेत. तसंच मटाराचा भाव देखील परवडणारा आहे. त्यामुळे हिवाळ्यातील खास रेसीपी म्हणून आज आपण मटार करंजी कशी तयार करतात हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

१ कप मटार, १ कप मैदा, १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून हींग, आलं, लसून, हिरवी मिरची, मीठ, तेल, पाणी, ओल्या नारळाचा किस्स,साखर,हळद, धनेपुढ आणि गरम मसाला

- Advertisement -

कृती 

पहिल्यांदा एक कप मैदा घेऊन त्यात चवीपुरते मीठ आणि गरम तेलं घालायचे. मैदा आणि तेल एकत्रित करून मिसळून घ्यायचा. यात थोडेप्रमाणात पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा तयार करावा. साधारण १५ ते २० मिनिटे तो गोळा तयार करून पिठ मिरविण्याकरीता ते झाकून ठेवायचे. हे झालं करंजीचे कोटींग. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, हींग आणि चमचाभर आलं, लसून, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. मग यानंतर आता चमचाभर धनेपुढ, अर्धा चमचा हळद , अर्धा चमचा गरम मसाला व पाव कप ओल्या नारळाचा किस या मिश्रणात एक कप मटार घालून तो मिक्स करून घ्यायचा. मटार हा १५ ते २० मिनिटे शिजवून त्यात थोडे चवीनुसार मिठ, साखर आणि हवे असल्यास लिंबाचा रसही घालावा. यानंतर तयार मिश्रण स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर कोटींग करता तयार केलेल्या पिठाचा लहान गोळा जास्त जाडसर न करता मध्यम आकारत लाटून घ्यायचा. मग यात तयार सारण भरून त्याभोवती करंजी प्रमाणे थोडेसे पाणी कडेला लावून झाकून घ्यायचे. त्यानंतर करंजी मंद आचेवर तळून घ्यायची. अशाप्रकारे चविष्ट आणि खमंग मटार करंजी खाण्यासाठी तयार झाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -