तुम्ही अंडं खात नाही? मग ‘हे’ फायदे नक्की वाचा

अंडे खाण्याचे फायदे

Mumbai
The health benefits of eggs
अंडे खाण्याचे फायदे

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! हे आपण नेहमी ऐकतो. मात्र, असे बरेच जण आहेत, ज्यांना अंडे खावेसे वाटत नाही. किंवा अंड्याच्या उग्रस वासाने अंडे खाणे टाळतात. मात्र, अंडे हा शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात १८० अंडी खाण्याची गरज आहे.

लोह मिळते

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, विविध जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक असे बहुतांशी घटक मिळतात. त्यामुळे अंड्याचे सेवन करावे.

डोळे निरोगी होतात

अंड्यातील बलकामुळे डोळे निरोगी राहण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठी मदत होते.

हाडांची मजबुती

अंड्यामुळे हाडांची मजबुती होते. त्यामुळे हाडे ठिसूळ झाल्यास अंड्याचे सेवन करण्यास डॉक्टरही सल्ला देतात.

त्वचा तजेलदार होते

अंड्याचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार होते.

बौद्धिक विकासात उपयुक्त ठरते

अंड्याच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो. तसेच अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२ मिळते. त्याचप्रमाणे अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.


हेही वाचा – तुमच्याही टाचा दुखतात? ‘हे’ करा उपाय