घरलाईफस्टाईलगरोदर स्त्रीसाठी लसीकरण महत्त्वाचे

गरोदर स्त्रीसाठी लसीकरण महत्त्वाचे

Subscribe

गरोदर स्त्रीने लसीकरण घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंध होऊ शकणाऱ्या संसर्गांपासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होते

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लसीकरणाच्या अभावी होणारे संसर्गजन्य आजार मातामृत्यू, अर्भकमृत्यू व बालकांच्या मृत्यूंसाठी तसेच व्यंगांसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. गरोदर स्त्रीने लसीकरण घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंध होऊ शकणाऱ्या संसर्गांपासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होतेच. गरोदरपणात लसीकरण झालेल्या मातांद्वारे प्रादुर्भावाशी लढा देणारी प्रथिने, यांना प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असे म्हटले जाते, त्यांच्या बाळांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे बाळाला या जगात आल्यानंतरचे पहिले काही महिने विशिष्ट आजारांपासून अंशत: संरक्षण मिळते. या काळात बाळ खूप लहान असल्याने त्याला थेट या लसी देणे शक्य नसते. गरोदर स्त्रियांनी कोणत्या लसी घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याबद्दल..

- Advertisement -

स्त्रियांना गरोदरपणात या लसी घेणे गरजेचे आहे?

गरोदरपणात तीन लसी आवर्जून देण्यात येतात. यापैकी २ धनुर्वाताला प्रतिकार करणाऱ्या तर एक फ्लूला प्रतिकार करणारी आहे.यामुळे नवजात अर्भकाला विचित्र खोकल्यापासून संरक्षण मिळते.

फ्लू (इन्फ्लुएंझा) शॉट: फ्लूचा प्रतिबंध करणारी लस घेणे ही आता काळाची गरज झाली आहे. बाळाला फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून जोडीदाराने तसेच जवळच्या संपर्कातील व्यक्तींनीही फ्लूची लस घेतली तर उत्तम. फ्लू झाल्यास दिवस भरण्यापूर्वी कळा सुरू होऊन लवकर बाळंतपणाचा धोका असतो. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे न्युमोनियासारख्या (फुप्फुसांना होणारा संसर्ग) जटील आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

गरोदरपणात या लसी टाळाव्यात

हेपॅटिटिस बी , हेपॅटिटिस ए , गोवर , एमएमआर , कांजण्या , नागीण (व्हरिसेला-झोस्टर)
या लशींमध्ये जिवंत विषाणूंचा समावेश असतो आणि त्यामुळे त्या आई व बाळासाठी प्राणघातक ठरू शकतात.

(डॉ. सुरभी सिद्धार्थ, सल्लागार, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग, मदरहूड हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -