घरलाईफस्टाईलपावसाळ्यात खास महिलांकरिता टिप्स

पावसाळ्यात खास महिलांकरिता टिप्स

Subscribe

पावसाळा हा अनेकाचा प्रिय ऋतू आहे. काही जण पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिकला जातात असतात. या पावसाबरोबर सोशल मीडियावर देखील सर्व कवीच्या कवीतेचा वर्षाव होत असतो. याच पावसात आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. पावसाळ्यात अनेक साथीचेरोग येत असतात. पावसाळा आला की, ऑफिसला जाताना कपडे कसे घालावे?, मेकअप करावा का?, त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी?, असे अनेक प्रश्न आपल्याला पावसाळ्यात पडतात.

पावसाळ्यात कसे कपडे वापरावेत?

कामाला जाण्याऱ्या महिला आणि तरुणींनी आपल्याजवळ एक पिशवी तसेच ज्यादाचे कपडे ठेवावे. पिशवीचा वापर हा तुम्हाला ओली छत्री किंवा रेनकोट ठेवण्यासाठी होतो. पावसाळ्यात डेनिम आणि टीशर्टचा जास्त वापर करु नये. कारण जर तुम्ही ते ऑफीसाला घालून गेल्यातर ते लवकर सुकत नाही आणि दिवसभर ओले कपडे घालून कामं करणं खूप कठीण जाईल. त्याऐवजी तुम्ही शिफॉन, मलमल, जॉर्जेटचे कपड्यांचा वापर करा. हे कपडे लवकर सुकतात. तसेच डेनिमला पर्याय म्हणून तुम्ही कंबरेच्या वर असलेले उंच असे स्कर्टस, ड्रेसही पेस्टल रंगाच्या शेडमध्ये घालू शकतो.

- Advertisement -

केसांची निगा कशी घ्यावी?

पावसाळ्यात जरी केस सोडणे उत्तम असेल तरी ते जास्त पावसात भिजणे टाळावे. जर केस भिजले असतील तर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करणे टाळावे. शक्यतो केस टॉवेलने कोरडे करावे. केसांना रात्री झोपताना ऑलिव्ह तेलाने मसाज करावा. केस धुण्यासाठी हर्बल शैम्पूचा वापर करणे चांगले असते. तसेच या दिवासात केसांना कलर करणे टाळा. कारण त्यामुळे केस गळतात.

त्वेचेची काळजी कशी घ्यावी?

अशा पावसाळी वातावरणात तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही तो करु शकता. फक्त वॉटरप्रुफ कॉस्मेटिक्सचा वापर करा. आय मेकअप जास्त करू नये. निळ्या रंगाची आय पेन्सिल किंवा पेस्टल रंगाचा वापर करावा. या काळात वातावरणातील आद्रेमुळे त्वचा ओलसर होते. यामुळे या काळात सनस्क्रीन लावणे टाळावे. ब्लीज आणि फेशियल करणे टाळावे. रात्री झोपताना दुधाची मलई ओठांना लावावी. जर ओठ फुटल्याचे जाणवल्यास नारळाचे तेल ओठांना लावावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -