घरमहा @२८८बोरीवली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १५२

बोरीवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५२

Subscribe

बोरीवली (विधानसभा क्र. १५२) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजे १९६२मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला. याचा लोकसभा मतदारसंघ असलेला मुंबई उत्तर जरी बहुभाषिक असला, तरी बोरीवली विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. या मतदारसंघात एकूण ३१० मतदान केंद्र आहेत. सुरुवातीच्या २ निवडणुका सोडल्या, तर या मतदारसंघात भाजपचाच आमदार आत्तापर्यंत निवडून आला आहे. त्यामुळे हा भाजपसाठी सेफ मतदारसंघ म्हणता येईल. २००४ आणि २००९च्या निवडणुकांमध्ये गोपाळ शेट्टी इथून निवडून आले होते, तर २०१४मध्ये विनोद तावडेंनी इथून निवडणूक जिंकली.

मतदारसंघ क्रमांक – १५२
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या

पुरुष – १,६९,४०८
महिला – १,५८,५४७

एकूण मतदार – ३,२७,९५५

- Advertisement -

Vinod Tawde
विनोद तावडे
विद्यमान आमदार – विनोद तावडे, भाजप

२०१४च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच विनोद तावडे विधानसभेवर निवडून गेले. अर्थात, याआधी देखील २००२, २००८ आणि २०११साली त्यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होतीच. त्याआधी त्यांनी भाजपच्या पक्षीय पातळीवरच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २००३ सालापासून त्यांनी भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. विधानसभेवर पहिल्याच प्रयत्नात निवडून आल्यानंतर त्यांच्यावर मंत्रिपदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली. सुरुवातीला त्यांच्याकडे ५ खाती होती. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्याकडची इतर खाती काढून फक्त विधिमंडळ कामकाज मंत्रीपद ठेवण्यात आलं. १९९५साली सर्वप्रथम विनोद तावडेंनी भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून पहिलं पक्षीय पद भूषवलं. बोगस डिग्री प्रकरणात विनोत तावडेंवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विनोद तावडे, भाजप – १,०८,२७८
२) उत्तमप्रकाश अगरवाल, शिवसेना – २९,०११
३) नयन कदम, मनसे – २१,७६५
४) अशोक सुतराळे, काँग्रेस – १४,९९३
५) नोटा – २०५६

मतदानाची टक्केवारी – ५४.५७ %


हे वाचा – बोरीवली लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -