कागल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७३

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (विधानसभा क्र. २७३) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

Kolhapur
273
कागल विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७३

मागील २० वर्षांपासून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे कागलचं प्रतिनिधित्व करत आहेत. कागल हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय घाडगेंचा पराभव केला होता.  राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून कागल तालुक्याची ओळख आहे. येथील विकासकामात श्रेयवादाचे राजकारण रंगते. त्यामुळे केलेल्या प्रत्येक विकासकामाचे उद्घाटन करुन त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी येथे गटातटात राजकारण होते. त्यामुळे एकाच कामाचं चार चार वेळा उद्घाटन या तालुक्यातील जनतेने पाहिलेले आहे. यामुळे येथील विकासकामांच्या बाबतीय येथील जनतेत संभ्रमाचे वातावरण दिसते. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ जनता दरबाराच्या माध्यमातून येथील जनतेशी संपर्कात राहतात तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय घाटगे हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात राहतात. मागील निवडणूकीत सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. यंदा मात्र युती, आघाडी होण्याची शक्यता आहे. तेव्हा यंदा कागलवर कोणता झेंडा फडकणार हे निवडणूकीचा निकालच सांगेल.

मतदारसंघ क्रमांक – २७३
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,५३,७४४
महिला – १,४८,२६१
एकूण – ३,०२,००५

विद्यमान आमदार – हसन मियालाल मुश्रीफ

hasan-mushrif
विद्यमान आमदार – हसन मियालाल मुश्रीफ

कागल मतदारसंघाचे हसन मियालाल मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत. २४ मार्च १९५४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे त्यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे यांचा दारूण पराभव केला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस – १,२३,६२६
२) संजय घाटगे, शिवसेना – १,१७,६९२
३) परशुराम तावरे, भाजप – ५,५२१
४) संतान बार्डेस्कर, काँग्रेस – १,०३५
५) सुहास कांबळे, बसपा – ८३६


हेही वाचा – राधानगरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७२