घरमहा @२८८परळी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३३

परळी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३३

Subscribe

बीड जिल्ह्यातील परळी (विधानसभा क्र. २३३) विधानसभा मतदारसंघ आहे.

बीड जिल्ह्यातील परळी हा क्रमांक २३३ वा विधानसभा मतदारसंघ आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात लढत होती. तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघा पूर्वी हाच मतदारसंघा रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. याच मतदारसंघांमध्ये गेल्या आठ निवडणुकांमध्ये एकदा अपवाद वगळता सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणूनच हा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मुंडे यांचा वारसा पुढे कोण चालवणार याविषयीसुद्धा बरीच चर्चा झाली. मात्र पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांचा समर्थ वारसा सांभाळत आपल्या वडिलांची म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची राजकीय कारकीर्द पुढे नेत होत्या. आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर दोन निवडणुका होत्या. त्यातही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात केली.

मतदारसंघ क्रमांक – २३३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,४६,७७०

महिला – १,२७,००५

एकूण मतदार – २,७३,७७५

विद्यमान आमदार – पंकजा मुंडे-पालवे, भाजप

२०१४ साली बीड जिल्ह्यात कै. गोपीनाथ मुंडे नंतरची पहिलीच निवडणूक असल्यामुळे निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा पैकी ५ विधानसभेवर पुन्हा भाजपाने आपला झेंडा रोवला तर लोकसभेची जागा ६ लाख ९२ हाजाराच्या फरकाने रेकार्डब्रेक करत काबीज केली होती. बीड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला राखण्यात यश आले. गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मात निधनानंतर बीड जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणुक व विधासभेच्या ६ जागांसाठी मतदान झाले. परळी, गेवराई, माजलगाव, केज, आष्टी पाटोदा विधासभा काबीज करण्यात भाजपाला यश आले. परळीमधून पंकजा मुंडे २६ हजार १८४ मतांनी विजयी झाल्या.

pankaja munde palwe
आमदार पंकजा मुंडे-पालवे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) पंकजा मुंडे-पालवे, भाजप – ९६,९०४

२) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी – ७१,००९

३) प्रा. टी. पी. मुंडे, काँग्रेस – १४,९४६

४) उत्तम माने, माकप – ३,०५३

५) अनंत गायकवाड, बसपा – १,६९९

हे वाचा – ३९ – बीड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -