घरमहा @२८८शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ - म.क्र. ८

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ८

Subscribe

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा (विधानसभा क्र.८) विधानसभा मतदारसंघ आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या फेररचनेत २००९ मध्ये शिंदखेडा मतदार संघ तयार करण्यात आला. त्यापुर्वी हा मतदार संघ शहादा दोंडाईचा मतदार संघ असा ओळखला जात होता. या मतदार संघात पुलोद, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने २००४ पुर्वी वर्चस्व होते. या मतदार संघात पाटील व राजपुत मतदारांची निर्णायक संख्या आहे. दोंडाईचा , शिंदखेडा , नरडाणा यासारखी मोजकी गावे सोडली तर हा भाग ग्रामीण शेती व्यवसाय करणारा भाग आहे. या मतदार संघात आता नरडाणा शिवारात औदयोगीक वसाहत तयार होते आहे. तसेच विखरण शिवारात सौर प्रकल्प प्रस्तावित आहे.

मतदार संघ क्रमांक : ८

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष : १,६५,९६४,
महीला : १,६०,०६९
एकुण मतदार : ३,२६,०३३

- Advertisement -

विद्यमान आमदार : जयकुमार रावल, भाजप

स्व दादासाहेब रावल यांचे नातू म्हणजेच राज्याचे पर्यटन तथा रोहयो मंत्री जयकुमार रावल हे आहेत.तत्कालीन दोंडाईचा शहादा मतदार संघातुन दादासाहेब हे 1952 मधे विधानसभेचे सदस्य होते. त्यानंतर मंत्री रावल यांचे काका बापुसाहेब रावल यांनी १९७८ कीटावर विजय मिळवला होता. या मतदार संघातुन मंत्री रावल यांनी सर्वप्रथम २००४ उमेदवारी केली. त्यावेळी त्यांनी तत्कालिन राज्यमंत्री डॉ हेमंत देशमुख तसेच माजी मंत्री पी के पाटील यांचा पराभव केला. यानंतर २००९ मतदार संघाची पुनर्रचना केल्यानंतर शिंदखेडा मतदार संघ तयार झाला. या मतदार संघातुन २००९ मधे आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा हेमंत देशमुख व काँग्रेसचे श्याम सनेर यांचा पराभव केला.२०१४ मधील निवडणुकीत त्यांनी पुन्हा या मतदार संघातुन विजय मिळवत राज्याच्या मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे.

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ आमदार जयकुमार रावल

२०१४ विधानसभा निवडणुकीची स्थिती

जयकुमार रावल भाजपा -९२,७९४
संदीप बेडसे राष्ट्रवादी – ५०,६३६
श्यामकांत सनेर कॉग्रेस – ४८,०२५
राजेंद्रसिंग गिरासे  शिवसेना २,२३६


हे देखील वाचा –  धुळे लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -