घरमहाराष्ट्रशालेय पोषण आहारातून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

शालेय पोषण आहारातून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

Subscribe

पुण्यातील घटनेने खळबळ

पुण्यातील कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाऊंडेशनच्या शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका आणि २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. कात्रजमधील रामभाऊ म्हागळी फाऊंडेशनच्या शाळेतील शालेय पोषण आहारांतर्गत दुपारी भाताची खिचडी इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीना देण्यात आली. ही खिचडी शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा किरकोले यांनीही खाल्ली.

मात्र खिचडी खाल्ल्याबरोबर शाळेतील २३ विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्याबरोबर त्यांना तात्काळ भारतीय विद्यापठाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुख्याध्यापिका किरकोले यांचीही तब्येत बिघडली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शना आल्यावर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या शाळेला पोषण आहार देण्यासासाठी चार दिवसांपूर्वी नव्या बचत गटाला (सेंट्रल किचन) या कामाचा ठेका दिल्याचे समजते. दरम्यान शाळेने या प्रकरणी भारती विद्यापीठाच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून त्यात अन्न शिजवणार्‍या रजनी महिला कार्यकारी या संस्थेवर कारवाईची विनंती केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळत होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचवेळी शाळेकडून कारवाई झाली असती तर आजचा गंभीर प्रसंग उद्भवला नसता असा आरोप पालकांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -