घरताज्या घडामोडीराज्याला १७ लाख ५० हजार लसींची गरज - आरोग्यमंत्री

राज्याला १७ लाख ५० हजार लसींची गरज – आरोग्यमंत्री

Subscribe

राज्याला १७ लाख ५० हजार कोरोना लसींची गरज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

‘राज्यात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी राज्यात ९ लाख डोस दाखल झाले असून राज्याला अजून १७ लाख ५० हजार लसींची गरज’, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वृत्तवाहिनीला दिली आहे. दरम्यान, राज्यात ५११ केंद्रावर कोरोना लसीकरण करण्यात येणार असून सुमारे पन्नास हजरांपेक्षा अधिक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या दिवशी ५० हजारहून अधिक जणांना लस

प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी राज्यात पन्नास हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणासाठी कोव्हिन Appद्वारे एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना एसएमएस प्राप्त झाले आहेत. त्यांनी कोरोना लसीकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन कोरोना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

- Advertisement -

उपसंचालक कार्यालय

राज्यातील आठ ठिकाणी कोरोना लसीचे स्टोरेज केले जाणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, मराठवाड्यात लातूर, औरंगाबाद, विदर्भात अकोला आणि नागपूर या आठ ठिकाणी कोरोना लसी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या लसींचे जिल्ह्यात वितरण केले जाईल.

सामान्याच्या लसीकरणाबाबत केंद्र ठरवणार

सामान्याना लस देण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाची ही लस गरोदर महिला आणि लहान बालकांना दिली जाणार नाही. तसेच सामान्याच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार ठरवणार आहे.

- Advertisement -

कोरोनाची लस सुरक्षित

कोरोनाची लस घेण्याबाबत अनेकांच्या मनात भिती आहे. पण, लस सुरक्षित असलेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लस घेतल्यानंतर सूज येणे, अस्वस्थ वाटणे अशा सुरुवातीला समस्या जाणवतील. त्याचप्रमाणे दोन डोसनंतर ४ ते ६ दिवसांचा कालावधी असणार आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: ‘या’ लोकांनी लस घेताना एकदा नक्की विचार करा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -