घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनासाठी कंत्राटदारांकडून महापालिकेला २ कोटींची मदत!

Coronavirus : कोरोनासाठी कंत्राटदारांकडून महापालिकेला २ कोटींची मदत!

Subscribe

मुंबई महापालिकेच्या काही मोजक्या कंत्राटरांनी पाच ते दहा लाखांची मदत गोळा करत महापालिकेला २ कोटी रुपयांची आर्थिक मदत महापालिकेच्या कोरोनासंदर्भातील सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या आवाहनानुसार, अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला आर्थिक मदतीचा हात कंत्राटदारांनी पुढे केला आहे. मुंबई महापालिकेच्या काही मोजक्या कंत्राटरांनी पाच ते दहा लाखांची मदत गोळा करत महापालिकेला २ कोटी रुपयांची आर्थिक मदत महापालिकेच्या कोरोनासंदर्भातील सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा धनादेश सहआयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडे सुपूर्द केला जाण्याची असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

‘आयुक्तांच्या देणगीच्या आवाहनाला महापालिका कंत्राटदारांचा आखडता हात’ याबाबतचे वृत्त ‘आपलं महानगर’ वृत्तपत्रात तसेच ‘माय महानगर’ या वेब पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर, मुंबई महापालिकेशी संबंधित कंत्राटदारांनी महापालिकेला आर्थिक स्वरुपात मदतनिधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही कंत्राटदारांनी पाच लाख व काही मोठ्या कंत्राटदारांनी दहा लाख रुपये अशा स्वरुपात २ कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. याबाबतच्या निधीचा धनादेश तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला या धनादेशावर महापालिकेचे नाव टाकण्यात आले होते. परंतु ही मदत कोरोनासंदर्भात असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र खाते तयार करण्यात आल्यामुळे त्यानुसार नावात बदल करत धनादेश बनवून देण्याच्या सुचना महापालिका प्रशासनाने केल्या आहे. त्यानुसार सोमवारी धनादेशावरील नाव बदलून येत्या मंगळवारी २ कोटी रुपयांचा धनादेश आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहआयुक्त आशुतोष सलिल हे स्वीकारणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

कंपन्यांकडून पाच ते दहा लाखांची मदत

आर.के.मधानी, एम.ई.इन्फ्रा, आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट, एम.बी.इन्फ्रा, स्कायवे इन्फ्रा. प्रकाश इंजिनिअरींग, लँडमार्क, प्राईम सिव्हिल, फोर्स, एच.व्ही. कन्स्ट्रक्शन, महावीर, डी.बी.इन्फ्राटेक, कोणार्क, ब्युकॉन, एपीआय सिव्हिलकॉन, मिशिगन, रेलकॉन,योगेश कंस्ट्रक्शन, भाव्या कंस्ट्रक्शन, शेठ कंस्ट्रक्शन, एम.बी.ब्रदर्स, नवदीप कंस्ट्रक्शन, एरिक इन्फ्रा., मरुधर एंटरप्रायझेस, आर्मस्टाँग, यश एंटरप्रायझेस, न्यू इंडिया रोडवेज, मानसी कंस्ट्रक्शन, पी.बी.कंस्ट्रक्शन, मनिषा कंस्ट्रक्शन, कंप्युटर इंजिनिअरींग आणि देव इंजिनिअरींग आदी कंपन्यांनी प्रत्येकी पाच ते दहा लाख रुपये मदतनिधीत जमा केल्याची माहिती मिळत आहे.

आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी वैयक्तिक तसेच ट्विटरच्या माध्यमातून विविध मोठ्या कंपन्या आणि संस्था आदींना आवाहन करत व्हेंटिलेटर, पीपीई, सॅनिटायज़र्स, ग्लोव्हज़, मास्क, इत्यादी देणगी स्वरूपात देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार विविध कॉर्पोरेट कंपन्या, संस्था तसेच व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी आदींनी महापालिकेला सढळ हस्ते मदत केली होती. परंतु महापालिकेची विकासकामे मिळवणारे कंत्राटदार  अशाप्रसंगी मदतीत मागे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -