पुणे-सोलापूर मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघे जागीच ठार

या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तिघेही जण लातूरमधील औसा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai
accident
अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर माढा तालुक्यातील शिराळ (टें) गावाच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री २.३० ते ३ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहन आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तिघेही जण लातूरमधील औसा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

असा घडला अपघात

गुरुवारी मध्यरात्री २.३० ते ३ वाजताच्या सुमारास माढा तालुक्यातील शिराळ (टें.) गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एम. एच. २४-बी.५२४१) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. इंदापूर येथील रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. तर अपघातात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत.