शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीस यांनी सेनेवर साधला निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. यावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं असा टोला लगावत सेनेचा ‘शवसेना’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि अमृता फडणवीस यांच्यात जुंपणार आहे.

अमृता फडणवीस यांनी देवंद्र फडणवीस यांची बिहारमध्ये NDA चा विजय मिळाल्यानंतर दिलेली मुलाखत शेअर केली आहे. यामध्ये बिहार निवडणुकीत शिवसेनेने खराब कामगिरी करत आपले हसे कसे करुन घेतले यावर फडणवीसांनी भाष्य केले. हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हटले आहे. “काय चाललंय हे- शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये शवसेनाने आपल्याच साथिदारांनाच ठार केले. महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद,” असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.