घरट्रेंडिंगडॉक्टरांना मिळणार कायदेशीर कवच, असीम सरोदे सरसावले

डॉक्टरांना मिळणार कायदेशीर कवच, असीम सरोदे सरसावले

Subscribe

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधातले कॅम्पेन असीम सरोदे यांच्या नेतृत्वात सुरू झाले आहे.

सगळेच डॉक्टर वाईट नसतात. डॉक्टरांना भीतीमुक्त वातावरणात कम करता आले पाहिजे. डॉक्टरांचे अधिकार अधिकार हे नीट मांडले गेले नाहीत. म्हणूनच या विषयावर काम करत वैद्यकीय क्षेत्रातील कायदेशीर गोष्टींवर काम करण्याचा निर्णय हा जेष्ठ वकील असीम सरोदे यांनी घेतला आहे. पेशंटच्या अधिकारांबद्दल बरेच बोलले गेले आहे. म्हणूनच त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रात एकुण १४८ कायदे आहेत, पण या कायद्यांबाबत डॉक्टरांमध्ये जागरूकता नाही.
वैद्यकीय क्षेत्रातील कायदेशीर अधिकारांवर काम करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांशी कनेक्ट करून देण्यासाठी कनेक्ट करून देण्यासाठीचे आवाहन केले आहे. मेडिको लिगल या संकल्पनेवर काम करताना डॉक्टर्स, हॉस्पिटल, नर्सेस अशा अनेक लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा मानस आहे. सजग वकिलांची टीम आणि डॉक्टर मिळून भयमुक्त वैद्यकीय सेवा मिळतील असे प्रयत्न करू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांना धमकावणे, दमदाटी करण्याच्या ५५० हून अधिक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. या संपुर्ण पुढाकारासाठी एक सल्लागार समितीची नेमणुक करण्यात येईल. या समितीवर नामवंत डॉक्टरांची नेमणुक करण्यात येणार आहे. त्यासाठीच सल्लागार समितीवर डॉ मोहन आगाशे तसेच आरोग्य विभागाचे माजी संचालक संजय कुमावत यासारख्या अनुभवाने जेष्ठ असलेल्या डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात येणार आहे.

‘लॅम्प’ साठीचा पुढाकार

कायदेशीर गोष्टी दुर्लक्ष झाल्याने अनेकदा डॉक्टरांवर गुन्हे दाखल होतात. डॉक्टरांच्या कामातही पारदर्शकता असली पाहिजे म्हणून हा पुढाकार असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले. रूग्णांचे अधिकार समजून डॉक्टर वागतील असेही आम्हाला अभिप्रेत आहे. डॉक्टर हे तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करतात हे डॉक्टरांनी रूग्णांना समजावून देणे गरजेचे आहे. अनेक उपचारांमध्ये रूग्णाला विश्वासात घेऊन आणि सज्ञान करून ट्रिटमेंट देणे अपेक्षित आहे.
वैद्यकीय क्षेत्रा जे कायदे लागू आहेत, त्याची परिपुर्तता डॉक्टरांकडून होणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सहभाग असलेला लॉ इन एक्शन फॉर मेडिकल प्रोफेशनल (लॅम्प) साठीचा पुढाकार आम्ही घेत आहोत. या पुढाकाराअंतर्गत महाराष्ट्रातील सगळ्या डॉक्टरांना सदस्य करून घेण्यासाठी वर्षभर काम करणार आहोत. साधारणपणे १०० सदस्यांची नोंदणी झाल्यानंतर यापुढची रूपरेषा ठरेल असेही सरोदे यांनी सांगितले.

- Advertisement -

आम्हाला महाराष्ट्रातील डॉक्टरांशी कनेक्ट करून दया. #medicolegal विषयांवर अनेक डॉक्टर, हॉस्पिटल्स, नर्सेस अशा अनेकांसोबत काम सुरू करीत आहोत. अमच्यासोबतची सजग वकिलांची टीम व डॉक्टर मिळून ‘भयमुक्त वैद्यकीय’ सेवा मिळतील असे प्रयत्न करू शकतील #doctors #nurses #hospitals #IMA

— Asim Sarode (@AsimSarode) February 25, 2020

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा कमी व्हावा

वैद्यकीय निष्काळजीपणा कमी करण्यासाठीही हा पुढाकार आहे. त्यासाठी डॉक्टरांसोबत कार्यक्रम करताना असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाची जाणीव करून देणे, तसेच न्यायालयीन खटले याबाबतची माहिती करून देणे हे आमच्या या पुढाकाराच्या माध्यमातून करण्यात येईल.

आतापर्यंत ५५० हून अधिक घटनांची नोंद

गेल्या वर्षात महाराष्ट्रात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ५४ घटना, तर पुण्यात डॉक्टरांना धमकावणे, दमदाटी करण्याच्या सुमारे ५५० हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे दहा वेळा डॉक्टरांवर हल्ले झाल्याची नोंद इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -