दिवाळीनंतर महागणार या कंपन्यांची कार, बघा किती वाढणार भाव

AUDI-RS7

जगभरातील प्रसिद्ध कार निर्मितीमधील कंपन्यांकडून दिवाळीच्या सणानंतर कारच्या किंमतींमध्ये दर वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कारच्या चाहत्यांमध्ये क्रेझ असलेली जर्मन कंपनीची ऑडीच्या किंमतीमध्ये दिवाळीनंतर वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. काही कारणांमुळेच ही वाढ करण्यात येईल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

येत्या जानेवारी २०२१ पासूनच ऑडी इंडियाने २ टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत सातत्याने कमी होत असल्यानेच ही वाढ करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतात यंदाच्या वर्षात लॉंच झालेल्या गाड्या

ऑडीने यंदा भारतात Q8, A8 L, RS 7 स्पोर्टबैंक, RS Q8, Q8 सेलिब्रेशन आणि Q2 या कार लॉंच केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या सणाच्या कालावधीत कंपनीने मोफत इन्शुरन्स आणि सर्व्हीस पॅकसारख्या गोष्टी लॉंच केल्या आहेत. त्यामध्ये आकर्षक फायनान्स सोल्यूशन, मिनिमम रिसेल व्हॅल्यू, ३ ते ५ वर्षांपर्यंत मोफत सर्व्हीस वॉरंटी यासारख्या ऑफर्सचा समावेश आहे.

ग्राहकांना ८.५ लाखांची सूट

ऑडीने आपल्या अल्ट्रा लक्झरी कारवर ५ टक्क्यांपासून ते ८.५ टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना अडीच लाखांपासून ते ८.५ लाखांपर्यंतची सूट मिळत आहे. लक्झरी कार खरेदीसाठी यंदा सकारात्मक ट्रेंड असून या संपुर्ण सणांच्या कालावधीत आणखी ग्राहकांकडून ऑडीच्या खरेदीचा कल वाढेल असा विश्वास कंपनीला आहे. ऑडीमार्फत फेस्टीव्ह सिझनच्या आधीच ऑडी क्यू २ लॉंच करण्यात आली आहे.