घरCORONA UPDATEमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगडमधील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगडमधील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार

Subscribe

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमधील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दि. ५ जून (शुक्रवार) रोजी सकाळी भेट देणार आहेत. तसेच अलिबाग येथे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानग्रस्त भागाला तात्काळ मदत कशी देता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आजच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ , साधन सामुग्री उपलब्ध करावी असे निर्देश दिले होते.

मुख्यमंत्री आजच्या बैठकीत म्हणाले की, सुदैवाने चक्रीवादळाचा जोर ओसरला. पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल. तत्पुर्वी आजच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी महावितरणने युद्धस्तरावर जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यासहीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -