घरCORONA UPDATECorona in Maharashtra: कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या नऊ लाखांच्या पार

Corona in Maharashtra: कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या नऊ लाखांच्या पार

Subscribe

सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक २३ हजार ३५० रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सर्वाधिक २ हजार ५३८ रुग्ण असून त्याखालोखाल मुंबई (१,९१०), नागपूर (१,५१८), कोल्हापूर (१,१७१)आणि नाशिक (१,१४६) यांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ लाख ०७ हजार २१२ झाली आहे. राज्यात २ लाख ३५ हजार ८५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २६ हजार ६०४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात ३२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३७, ठाणे ७, नवी मुंबई मनपा ९, मीरा भाईंदर मनपा २, रायगड ८, पनवेल मनपा २, नाशिक ८, अहमदनगर ८, जळगाव १३, पुणे ४१, पिंपरी चिंचवड मनपा ११, सोलापूर १५, सातारा १२, कोल्हापूर ८, सांगली ४२, औरंगाबाद ४, लातूर ६, उस्मानाबाद ११, नांदेड ९, नागपूर २२, अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३२८ मृत्यूंपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४२ मृत्यू पुणे १०, ठाणे ८, जळगाव ४, सोलापूर ३, सांगली ३, अहमदनगर २, रायगड २, सातारा २,औरंगाबाद २, कोल्हापूर १, नांदेड १, नाशिक १, उस्मानाबाद १, पालघर १ आणि कर्नाटक १ असे आहेत. आज ७ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६ लाख ४४ हजार ४०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०३ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४६ लाख ४७ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९ लाख ०७ हजार २१२ (१९.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ९६ हजार ०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३८,५०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -