तामिळनाडूत एकाचा मृत्यू, देशात ११ बळी

मदुराईच्या राजाजी रुग्णालयात उपचार सुरु होते. 

Tamilnadu
corona
करोना व्हायरस

तामिळनाडूत संशयित करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मदुराईच्या राजाजी रुग्णालयात उपचार सुरु होते. तामिळनाडूत एकूण १८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आज एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील करोनामुळे दगवणाऱ्यांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात ५४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. २३ मार्च रोजी त्याला राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याने उपचाराला साथ दिली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत गेल्याने आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण परदेशातून आला होता, असे सूत्रांनी सांगितले.

याशिवाय देशात करोनाचे एकूण ५६० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला असून ४६ रुग्ण बरे झाले आहेत. देशातली करोना रुग्णांनाची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here