घरमहाराष्ट्ररायगडातील रस्ते अपघातात घट

रायगडातील रस्ते अपघातात घट

Subscribe

मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाचा गौरव

रायगड जिल्हा प्रशासनाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्याने रस्ते अपघाताचे प्रमाण 28 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सोमवारी मुंबईत सत्कार करण्यात आला.

मुंबईत परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य आणि मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर उपस्थित होते.

- Advertisement -

रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविले. सुरक्षितरित्या वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शन करणारे फलकदेखील महामार्गावर लावण्यात आले आहेत. याखेरीज महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी 4 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून दिली आहेत. यातून बेजबाबदार वाहनचालक कॅमेर्‍यात बंदिस्त होतात. त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत आहे. त्यामुळे रस्ते अपघातांवर आपोआप नियंत्रण आले आहे. रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण 10 टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण तब्बल 28 टक्क्यांनी कमी झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -