घरमहाराष्ट्रपुण्यातील मेट्रोचे काम रखडले; पंतप्रधानांचे आश्वासन फेल

पुण्यातील मेट्रोचे काम रखडले; पंतप्रधानांचे आश्वासन फेल

Subscribe

पुण्यात मेट्रो डिसेंबर २०१९ मध्ये धावेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन काही पूर्ण झाल्याचे दिसत नाही.

मेट्रोची ट्रायल रन आता डिसेंबर नाही तर जानेवारी मध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात डिसेंबर महिन्यात मेट्रो धावेल, असे जाहीर केले होते. परंतु, कामात येणाऱ्या अडचणींमुळे डेडलाईन पुढे ढकलण्याची वेळ महामेट्रोवर आली आहे. आतापर्यंत प्राधान्याने करावयाच्या कामापैकी केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुर्वनियोजनानुसार मेट्रोची ट्रायल रन आता जानेवारी मध्ये घेण्यासाठी महामेट्रोकडून जोरदार तयारी सुरू केली गेली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पुण्यात मेट्रो धावेल असे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने महामेट्रोने काम जोरात सुरू केले होते. परंतु प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण झाल्याने या कामास विलंब झाला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे मेट्रोचे काम रखडले

शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट असे दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या दोन मार्गापैकी वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गावरील काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आणि तेथे ट्रायल रन घेण्याचे नियोजित केले गेले होते. अडचणी निर्माण झाल्याने आत्तापर्यंत हे काम ६५ टक्केच पूर्ण झाल्याचे प्रकल्प अधिकारी अतुल गाडगीळ यांनी सांगितले. शहरांत सातत्याने पडलेला पाऊस, तांत्रिक अडचणीमुळे या कामाला गती मिळाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

या मार्गावरील काम पूर्ण होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार

वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर २१३ खांब उभारण्याचे काम प्रगती पथावर असून पूर्ण उंचीचे १८६ खांब उभारण्यात आले आहे. साधारणपणे २०० मीटर मार्ग तयार केला गेला आहे. ओव्हरहेड वीज वाहिनी करिता अकरा खांब उभारले गेले आहेत. पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गावरील सर्व खांबाचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे साडे पाच किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला गेला आहे. या दोन्ही मार्गावरील काम पूर्ण होण्यासाठी जानेवारी महिना उजाडू शकतो.

१४५६ इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण

भूमिगत मेट्रो मार्गच्यावरील भागात १०० मीटर परिसरात असलेल्या इमारतीचे आणि मिळकतीचे स्ट्रक्चर ऑडिट महामेट्रो करणार आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार मिळकतींचे ऑडिट झाले आहे. रेंजहील ते स्वारगेट परिसरातील १५५६ इमारती पैकी १४५६ इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण झाले. १०० सदनिका धारक या स्ट्रक्चर ऑडिटला विरोध केला असून त्यांना महामेट्रो नोटिसा पाठवणार असल्याचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

- Advertisement -

कशा प्रकारे होणार सर्वे?

महामेट्रोकडून शिवाजीनगर ते स्वारगेट या साडे सात किमी भूमिगत मेट्रो मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. जमिनीपासून २८ मीटर खाली या मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. मेट्रो निर्मिती दरम्यान मेट्रो मार्गाच्यावरच्या भागातील इमारतींना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी इमारतीच्या सद्यस्थितीचा सर्वे मेट्रो कडून करण्यात येत आहे. या सर्वे मध्ये इमारती आणि त्यातील प्रत्येक मिळकतीचा सर्वे करून सध्यस्थितीची फोटो स्वरूपात माहित देखील संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्ग निर्मितीच्या कामाचा कोणता परिणाम या मिळकतीवर होत आहे का यांची चाचपणी करण्यात येणार आहे. हे सर्वेचे काम मेट्रो कडून दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिल्या टप्यात रेंजहील ते बुधवार पेठ स्टेशन दरम्यान ५५६ इमारतींचा सर्वे करण्यात येणार आला असून तो १०० टक्के पूर्ण झाला आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील कसबा पेठ ते स्वारगेट भागातील १००४ इमारतींचा सर्वे होणार असून यामधील १०० इमारतींचा सर्वे अद्याप होऊ शकला नाही. या ठिकाणी मेट्रोला नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे सर्वेची काम खोळंबली आहे. त्यामुळे आता महामेट्रो या सदनिका धारकांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. भविष्यात मेट्रोच्या कामामुळे ह्या सदनिकांना इजा झाल्यास मेट्रो त्याला जबाबदार नसेल असे त्या नोटीस मध्ये नमूद करण्यात येणार आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.


हेही वाचा – पुण्याच्या कात्रज चौकातली वाहतूक कोंडी सुटणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -