अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसह दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा

राज्य सरकारने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, क्यूआर कोड काढण्याची सक्ती केली आहे. जोवर क्यूआर कोड मिळत नाही तोपर्यंत ओळखपत्र दाखवून लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासोबतच दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १५ जूनपासून अत्यावश्यक सेवेतील सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवास करता येत आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना अजूनही लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी नाही आहे. दरम्यान, आज पत्रकारांसह दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी लवकरात लवकर ‘क्यूआर’ कोड प्राप्त करावा. तसंच अपंगांच्या राखीव डब्यातून दिव्यांग प्रवासी आणि कॅन्सर रुग्णांना योग्य ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दाखवून प्रवास करता येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार; जे. पी. नड्डांचं सूचक विधान