घरमहाराष्ट्रराज्यपालांच्या आर्थिक मदतीवरुन वादंग

राज्यपालांच्या आर्थिक मदतीवरुन वादंग

Subscribe

खरीप पिकांसाठी प्रती हेक्टरी ८ हजार, फळबागायती/बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजारांची घोषणा, मदत तुटपुंजी - महाशिवआघाडी

राज्यात नुकत्याच झालेेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अखेर राज्यपालांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला असून शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना खरीप पिकांसाठी प्रती हेक्टरी ८ हजार रुपये तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत देण्याची घोषणा राज्यपालांनी केली.

मात्र राज्यपालांनी केलेली ही मदत तुटपुंजी असल्याची टीका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होत असल्याने या मदतीवरून नवा वादंग उभा राहिला आहे. तसेच राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राज्यपालांनी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार केल्याचा आरोपही केला महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि इतर अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टर शेतपीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

- Advertisement -

या मागणीसाठी काही दिवसांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत राजभवनावर धडक मारली होती. तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांनी याप्रश्नी राज्यपालांची भेट घेत या शेतकर्‍यांना त्वरीत हेक्टरी 25 हजार रुपये मदत करण्याची मागणी केली होती. या सर्वांची गंभीर दखल घेत शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी शेतकर्‍यांना मदत जाहीर केली मात्र केलेली मदत तुटपुंजी आहे असा आरोप होत आहे.

तर राजू शेट्टी यांनीदेखील या मदतीला विरोध दर्शविला आहे. काँग्रेसकडूनही या मदतीला विरोध दर्शविण्यात आला असून याबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही. म्हणूनच राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या मदतीत भरीव वाढ करावी. राज्यापालांच्या निर्णयामध्ये मदतीकरिता घातलेल्या दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणार नाही. त्यातही ८ हजार रूपये प्रति हेक्टर ही मदत अत्यंत तोकडी आहे.

- Advertisement -

पावसामुळे वाया गेलेल्या फळबागांना मदत म्हणून जाहीर केली प्रति हेक्टरी १८ हजार रू. ही मदत अत्यंत अपुरी आहे. मच्छीमार बांधवांना राज्यपालांनी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करून शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या मदतीत भरीव वाढ करावी ही आमची मागणी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी शेतकर्‍यांची केली आहे क्रूर चेष्टा- राजू शेट्टी
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर टीकास्त्र सोडले. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकर्‍यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकर्‍यांचे दु:ख कळणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे आणि शेतकर्‍यांची थट्टा करणारी आहे. जो नियम महापूरग्रस्तांसाठी लावण्यात आला आहे. तोच अवकाळी पावसासाठी लावणे गरजेचे आहे. ही सर्व चेष्टा सुरू आहे. राज्यपाल कधीही राजभवनाबाहेर पडले नाहीत. शेतकर्‍यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना शेतकर्‍यांचे दु:ख माहीत नाही. आपली काळी टोपी घालून नुसते राजभवनात बसतात. खरे तर त्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घ्याव्यात, ही तुटपुंजी मदत देताना दहा वेळा विचार करावा, असे शेट्टी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -