घरमहाराष्ट्रनगरविकास खात्याचे विभाजन?

नगरविकास खात्याचे विभाजन?

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून काहीच आलबेल नाही. आतापर्यंत खातेवाटप, बंगले, कॅबिन आणि पालक मंत्रिपदावरून वाद होत असताना आता एक वेगळीच माहिती पुढे आली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांनाच आता कात्री लावण्यात येणार आहे. शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचे विभाजन करण्यात येणार असून त्यातून नगरविकास खाते-३ हे नवीन खाते तयार करण्यात येणार आहे. हे खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असणार आहे. त्यात मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको असे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही दोन खाती आहेत. त्यापैकी नगरविकास खात्याचे विभाजन करून नगरविकास खाते-३ हे नवे खाते तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

ते खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार असल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असून मागील चार दिवसांपासून ते नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जाते. तसेच शिंदे यांच्या गोटात सध्या अस्वस्थताही पाहायला मिळत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेमागील एकनाथ शिंदे हे एक शिलेदार मानले जातात. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्यात एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्र बांधून ठेवले होते. पक्ष संघटना वाढवण्याच्यादृष्टीनेही एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते. राज्यात सरकार स्थापन झाल्यावर शिंदे यांना गृहमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र खातेवाटपात राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -