घरमहाराष्ट्रजेव्हा भाजपचा कर्मचारी सुजय विखेंना विचारतो साहेब आपण कोण?

जेव्हा भाजपचा कर्मचारी सुजय विखेंना विचारतो साहेब आपण कोण?

Subscribe

राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी सभागृहाच्या दरवाजाजवळ आले आणि आतमध्ये जात असतानाच त्यांना दरवाजावर उभ्या असलेल्या भाजपच्या कर्मचाऱ्याने साहेब आपण कोण? आतमध्ये बैठक सुरू आहे असे म्हणत अडवण्याचा प्रयत्न केला.

सध्या भाजपच्या दादर येथील कार्यालयामध्ये संघटनात्मक बैठक सुरू आहे. आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे भाजपच्या या संघटनात्मक बैठकीला भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि भाजपचे जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत. मात्र याच दरम्यान आज वसंत स्मृती येथील सभाग्रहाच्या हॉल बाहेर एक भन्नाट किस्सा घडला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी सभागृहाच्या दरवाजाजवळ आले आणि आतमध्ये जात असतानाच त्यांना दरवाजावर उभ्या असलेल्या भाजपच्या कर्मचाऱ्याने साहेब आपण कोण? आतमध्ये बैठक सुरू आहे असे म्हणत अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर ‘अरे मी खासदार आहे’, असे सांगितल्यावर या कर्मचाऱ्यांने त्यांना सभागृहात सोडले.

‘चेहरा ओळखण्यात गल्लत’; कर्मचाऱ्याचे स्पष्टीकरण

दरम्यान, सभागृहात सोडल्यानंतरही दरवाजावर असलेल्या त्या कर्मचाऱ्याला तो खासदार कोण आणि त्याचे नाव काय? असा प्रश्न पडला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या काहींनी त्याला सांगितले की, ‘आता जे आतमध्ये गेले ते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आहेत.’ हे ऐकताच त्या कर्मचाऱ्याला काही सुचेनासे झाले आणि चेहरा ओळखण्यात गल्लत झाल्याचे सांगत बाजू सावरून नेली. मात्र, या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यामध्ये एकच हशा पिकाला.

- Advertisement -

याआधी रणजित पाटील यांच्यासोबतही घडला आहे असा किस्सा

भाजप कार्यालयामध्ये असे किस्से घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील असे किस्से पहायला मिळाले होते. सप्टेंबरमध्ये वसंत स्मृती येथे झालेल्या बैठकी दरम्यान असेच एका महिला पदाधिकाऱ्याने माजी गृह राज्य मंत्री रणजित पाटील यांना साहेब तुमचे नाव काय? असा सवाल विचारला होता. त्यावेळी सभागृहाच्या बाजूलाच सगळ्यांची नोंद घेण्यासाठी एक टेबल लावण्यात आले होते. येथे नोंद केल्यानंतर पदाधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश करण्यासाठी प्रेवशपत्र आणि माहिती देण्यासाठी एक किट देण्यात येत होती. या प्रवेश पत्रावर त्या जिल्ह्याधिकाऱ्यांचे नाव आणि जिल्हा टाकण्यात येत होता. त्याचवेळी तेथे आलेल्या रणजित पाटील यांना तेथील एका महिलेने साहेब तुमचे नाव काय? असा सवाल विचारला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -