घरमहाराष्ट्रमुरुड मधील मौजे बोर्ली किनाऱ्यालगतची कुटुंबे धोक्यात

मुरुड मधील मौजे बोर्ली किनाऱ्यालगतची कुटुंबे धोक्यात

Subscribe

मुरूड तालुक्यतील मौजे बोर्ली समुद्रकिनारी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अर्धवट बंधाऱ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असणारी कुटुंबे धोक्यात आली आहेत.

मुरूड तालुक्यतील बोर्ली ग्राम पंचायत हद्दीतील मौजे बोर्ली समुद्रकिनारी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अर्धवट बंधाऱ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असणारी कुटुंबे धोक्यात आली आहेत.

बंधारा बांधण्यात यावा

बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बोर्ली कोळीवाडा येथे समुद्रालगत असणाऱ्या घराचे सन २०१७ ते २०१९ या तीन वर्षात झालेल्या अतिवृष्टी आणि समुद्राच्या महाकाय लाटांच्या माऱ्यामुळे समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या चाळीस ते पन्नास कुटुंबातील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोळी बांधव यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोर्ली मोरापाडा परिसरात काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) यांच्याकडून धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला होता. त्या बंधाऱ्यांचे काम आई कन्ट्रक्शन यांनी केले होते. मात्र, त्यावेळी बांधण्यात आलेला बंधारा हा अर्धवट मंजूर केल्यामुळे मोरापाडा भागातील घरांना बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे सरंक्षण मिळाले आहे. मात्र काही भाग हा तसाच राहिल्यामुळे समुद्राच्या महाकाय लाटांचा मारा थेट समुद्रालगत असणाऱ्या घरानां बसत आहे. सदर ठिकाणी बंधारा न बांधल्यास घराचे नुकसान होणार आहे. तरी या ठिकाणी बंधारा बांधण्यात यावा. भविष्यात समुद्रकिनारी असणारी घरे ही उध्वस्त होऊन त्या कुटुंबावर अर्थात समुद्राच्या राजावर बेघर होण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी सरपंच नौशाद दळवी यांनी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांच्याकडे केली आहे. यावेळी बोर्ली मंडलाधिकारी नारायण गोयजी, बोर्ली सजा तलाठी शिल्पा कवठे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

बोर्ली किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे काम त्वरित करणे

समुद्राच्या लाटांमुळे समुद्र किनारी असलेल्या घराचे नुकसान होवू नये, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्याकडून बोर्ली मच्छिमार सोसायटीच्या माध्यमातून सातशेतीस मीटरचा बंधारा मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी चारशे मीटर इतके बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. उर्वरित बंधाऱ्याचे काम हे गावातील काही लोकांनी तक्रारी केल्यामुळे रखडले. उर्वरित बंधाऱ्याचे काम करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे अजय सोडेकर यांनी सांगितले. बोर्ली समुद्र किनाऱ्यावरील पूर्ण बंधाऱ्याचे काम त्वरित करणे गरजेचे होते.


हेही वाचा – रायगडमध्ये सर्वच नद्यांना पूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -