१२ तास रुग्णवाहिकेची वाट पाहिली; कंटाळून ५ कोरोना रुग्ण गावभर हिंडून आले

ambulance
रुग्णवाहिकेचे प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रात  कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सुध्दा वैद्यकिय यंत्रणेच्या हलगर्जीपणाची वेगवेगळ्या घटना समोर येतात. अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. रूग्णवाहिके अभावी एका रूग्णाला तब्बल १२ तास ताटकळत उभे रहावे लागले. आणखी धक्कादायक बाब म्हणजे रूग्ण वाहिकेची वाट बघून वैतागलेले ५ रूग्ण गावात मुक्त संचार करताना दिसले.

बीड जिल्हातील लिंबागणेशमध्ये हा प्रकार घडला. रात्री अकरा वाजता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पाच रुग्णांना तब्बल १२ तास ताटकळत बसावे लागले. अखेर १२ तासांनी या रूग्णाला रूग्णवाहिका मिळाली. तर आणखी बीड मधील ५ रूग्णांना रूग्ण वाहिका उपलब्ध न झाल्यामुळे कंटाळलेल्या त्यांनी गावात भटकायला सुरूवात केली.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत. त्यामुळे रुग्णांना एकत्रित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जाते. रुग्णवाहिका कमी असल्यामुळे जिल्ह्यातील  रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास उशीर होत असल्याचे आरोग्य यंत्रनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


हे ही वाचा – कोरोना सोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्वाची – आरोग्यमंत्री