घरमहाराष्ट्रमाणगावच्या क्रिप्झो कंपनीत सिलिंडरचा स्फोट; १७ कामगार भाजले

माणगावच्या क्रिप्झो कंपनीत सिलिंडरचा स्फोट; १७ कामगार भाजले

Subscribe

सिलिंडर बनवण्याच्या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये १७ कामगार भाजल्याची घटना रायगडच्या माणगावमध्ये घडली आहे.

रायगडच्या माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक वसाहतीत क्रिप्झो इंजिनिअरिंग कंपनीत शुक्रवारी सायंकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात त्यात १७ जण जखमी झाले. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर माणगावचे उप जिल्हा रुग्णालय, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या कंपनीत ऑक्सिजनचे सिलिंडर तयार केले जातात. ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानक एका सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यात १७ कामगार भाजले. हा स्फोट नेमका कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -