घरमहाराष्ट्रआठवले यांना विधानसभेत योग्य सन्मान देऊ - मुख्यमंत्री

आठवले यांना विधानसभेत योग्य सन्मान देऊ – मुख्यमंत्री

Subscribe

लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्षांना किती जागा मिळतील अशी चर्चा सुरू असताना आठवलेंच्या पक्षाचा आता नाही तर विधानसभा निवडणुकीत नक्कीच विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्षांना किती जागा मिळतील अशी चर्चा सुरू असताना आठवलेंच्या पक्षाचा आता नाही तर विधानसभा निवडणुकीत नक्कीच विचार केला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी सांगितले. भाजपा सोशल मीडिया रुमचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. युती झाली पण मित्र पक्षाना किती जागा सोडणार हे भाजपाकडून काहीच सांगितले नसल्याने मित्रपक्ष सध्या नाराज आहेत त्यातच आज मुख्यमंत्र्यांनी आठवले यांना विधानसभेत योग्य सन्मान देऊ असे सांगितल्याने आठवलेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री

रामदास आठवले यांना आताच्या निवडणुकीत जागा देत नाही. मात्र आम्ही त्यांना विधानसभा निवडणुकीत योग्य सन्मान देऊ, असे सांगत २४ तारखेला आठवले आमच्याबरोबर स्टेजवर असतील, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी, अशी येथील जनतेची भावना असून, शिवसेनेला ही असे वाटत आहे मात्र ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं असं अजून वाटत नसल्याची नाराजी आठवले यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

- Advertisement -

इतर मित्रपक्षही नाराज 

एकीकडे रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपा सोबत असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती, जानकर यांच्या रासप तर विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने देखील लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून, भाजपाकडून अजून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने इतर मित्रपक्ष देखील नाराज आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -