घरमहाराष्ट्रमराठवाडा आणि विदर्भात पावसाचा धुमाकुळ

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा धुमाकुळ

Subscribe

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासाने शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी,नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे. अनेक भागात पूराचे पाणी गावामध्ये शिरले आहे.

गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावासाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुनरागमन केले आहे. या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये पावसामुळे ओढ्याला आलेल्या पूरामध्ये कार वाहून गेली. या कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये ओढ्यात तवेरा गाडी गेली वाहून

नांदेडमधील नायगाव तालुक्यातील मांजरम गावामध्ये ओढ्याला आलेल्या पूरामध्ये तवेरा गाडी वाहून गेली. या गाडीमध्ये दिवटे कुटुंबातील तीन जण होते. या तिन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिवटे दाम्पत्य आणि पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हे दिवटे कुटुंबिय नायगाव तालुक्यातील बरबडा गावातील रहिवासी होते.

- Advertisement -

भंडाऱ्यात पावसामुळे घर कोसळले

भंडाऱ्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे भंडारा तालुक्यातील राजेदहेगावात घर कोसळले. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला. खंडाते कुटुंबातील ३२ वर्षाचे स्करु खंडाते, २८ वर्षाच्या सारिका खंडाते आणि ३ वर्षाची सुकन्या खंडाते यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

पूरामुळे ५ नागरिकांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोकर, किनवट, लोहा, हिमायतनगर, नायगाव, धर्माबाद, हदगाव, उमरी, अर्धापूर, मुदखेड, नांदेड, बिलोली या बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड शहरामध्ये घरामध्ये पाणी शिरले आहे. गेल्या पाच दिवसात सात जण पुरात वाहून गेले असून, त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहे. तर दोन जणांचा शोध सुरु आहे. नांदेडमधील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

२४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे भंडारा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. म्हाडा कॉलनी आणि समृध्दी नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचले आहे. तर सुरेवाडा-खमारे रस्त्यावरुन नाल्याचे पाणी आल्याने रस्ता वाहतूकिसाठी बंद करण्यात आला आहे. भंडाऱ्यामधील नदी, नाल्यांना पूर आल्याने नागरिकांना सर्तक राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढच्या २४ तासात भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -