Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र रात्री घरी निघालेल्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार

रात्री घरी निघालेल्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार

पुण्यातील घटनेमुळे असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, पोलिसांनी केली संशयित आरोपीला अटक

Related Story

- Advertisement -

वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच पुण्यात अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणी रात्रीच्या सुमारास कॉल सेंटरमधील ड्युटी संपल्यानंतर घरी जात होती. एका तरुणाने तिचे अपहरण केले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. ती गुरुवारी रात्री काम झाल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी एका तरुणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने तिला गाठत मारहाण केली. नंतर बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि खराडीतील एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे तरुणीवर आरोपीने बलात्कार केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या तरुणीला येरवडा येथील गुंजन चौकात आणून सोडले.

- Advertisement -

झालेल्या घटनेने तरुणी हादरून गेली. त्याच अवस्थेत तरुणीने तात्काळ घडलेली घटना मित्राला फोन करून सांगितली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानुसार तक्रार दाखल करून घेतली. घटना घडलेल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यात आरोपीची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला काही तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच अशीच एक हादरवून टाकणारी घटना शहरात घडली होती. एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीसोबतच तीन नराधमांनी क्रूर कृत्य केले होते. पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता अपहरण करण्यात आले होते. वडगाव शेरी परिसरातून मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला होता.

- Advertisement -