चप्पल आणि सायकल वाटणं हे खासदाराचे काम आहे का? – राज्यमंत्री

'सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे हे खासदारांचे काम नाही. या स्वरुपाची कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी करतात, असे म्हणतं राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

Maharashtra
vijay shivtare
राज्यमंत्री विजय शिवतारे

‘सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे हे खासदारांचे काम नाही. या स्वरुपाची कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्याचे द्योतक आहे’, अशी घणाघाती आरोप राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या वार्तालापमध्ये केला आहे.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच त्या विजयी झाल्या होत्या आणि इतर तालुक्यात त्यांना फार कमी मते मिळाली होती,’ याची आठवणही शिवतारे यांनी करुन दिली आहे. तसेच पार्थ पवार आणि सुजय विखे यांच्या उमेदवारीबद्दल शिवतारे यांनी भाष्य केले आहे. ‘या दोघांचे काय कर्चुत्व आहे. केवळ नेत्याची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. तसेच त्यांच्या उमेदवाराचा विचार पक्षांनी करायला हवा होता,’ असे ते म्हणाले आहेत. तसेच ‘सुजय विखे हे डॉक्टर असल्याचा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात आणि सातत्यानं सांगितले जाते.’ मात्र, समाजात अनेक डॉक्टर आहेत जे समाजासाठी काम करतात, असही ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांची माढातून माघार

‘शरद पवार यांचे कार्य खूप मोठे आहे. पण माढ्यातील विकासकामांबाबत तेथील जनतेमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. पवारांनाही वाऱ्याची दिशा समजल्यामुळे त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली,’ असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.


वाचा – सुप्रिया सुळेंनी सांगितले, मुलायमसिंहच्या मोदी कौतुकाचे खरे कारण

वाचा – स्थानकांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळेंनी केली रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here