Corona In Maharashtra: राज्यात कोरोनाचा फैलाव कायम! दिवसभरात ३७० बळी

आज दिवसभरात राज्यातील १७ हजार २५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त

महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असले तरी येथील रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. पण वाढता मृत्यूदर राज्यातील अद्याप चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३८ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

 

आज दिवसभरात राज्यातील १७ हजार २५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याचा रिकव्हरी रेट ८०.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७२ लाख ४१ हजार ३७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ६५ हजार ९११ (२०.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ३८ हजार ३५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात २ लाख ४७ हजार ०२३ Active रुग्ण आहेत.

मुंबईत आज कोरोनाचे १,६२५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ६२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १७ हजार ०९० वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार १९९ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २३ हजार ९७६ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १ हजार ९६६ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८१ हजार ४८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


Mumbai Corona: चिंताजनक! एकूण २३,९७६ Active रूग्ण; आज १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज