घरदेश-विदेशआर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसच्या ५२०० जागा

आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसच्या ५२०० जागा

Subscribe

महाराष्ट्रात सर्वाधिक 970

आर्थिक मागासवर्गासाठी जाहीर केलेल्या आरक्षणाचा फटका अन्य प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक मागासवर्गाच्या (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तब्बल 5200 जागा वाढवल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा उपलब्ध केल्या आहेत. त्या खालोखाल गुजरातमध्ये 700 तर राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 450 जागा उपलब्ध केल्या आहेत.

केंद्र सरकारने आर्थिक मागासवर्गीयांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केल्याने त्याविरोधात सर्वच स्तरातून विरोध होत होता. आर्थिक मागसवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाचा फटका खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसणार होता. त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे आर्थिक मागसवर्गीय आरक्षणाला खुल्या प्रवर्गातून विरोध करण्यात आला होता. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये याचे परिणाम सर्वाधिक दिसून आले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशात तब्बल 5200 अतिरिक्त जागा वाढवल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या या जागा राज्य सरकारची कॉलेज, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी कॉलेज, महापालिकेची कॉलेज आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील कॉलेजांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी वाढवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

देशभरात वाढवण्यात आलेल्या 5200 जागांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा उपलब्ध केल्या आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये 700 तर राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 450 जागा उपलब्ध केल्या आहेत. आंध्र प्रदेशात 360 आणि उत्तर प्रदेशात 326 जागा आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी दिली.

एमबीबीएसच्या राज्यनिहाय वाढीव जागांची यादी
राज्य वाढीव जागा
महाराष्ट्र 970
गुजरात 700
पश्चिम बंगाल 450
राजस्थान 450
आंध्र प्रदेश 360
उत्तर प्रदेश 326
मध्य प्रदेश 270
बिहार 190
तेलंगणा 190
आसाम 174
केरळ 155
छत्तीसगढ 120
हिमाचल प्रदेश 120
दिल्ली 115
हरियाणा 110
ओदिशा 100
पंजाब 100
जम्मू-काश्मीर 85
उत्तराखंड 75
झारखंड 30
गोवा 30
पद्दुचेरी 30
मणिपूर 25
त्रिपुरा 25
एकूण 5200

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -