Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र फौजदारी खटले लपवल्याची तक्रार मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

फौजदारी खटले लपवल्याची तक्रार मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

Related Story

- Advertisement -

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर असलेले फौजदारी खटले लपवल्याची तक्रार भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी केली होती. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा भागडिया हायकोर्टात गेले. हायकोर्टाने वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमस्वरुपी पत्ता दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत. त्यामुळे भांगडिया कोर्टात गेले. त्यावेळी कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला नोटीस काढल्या. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझ्यावर कुठल्याही केसेस नाही. त्यावेळी माझ्यावर 4 किरकोळ राजकीय केसेस होत्या. स्पेशल ब्रँचकडून माझ्यावर कुठल्याही केसस नाही हे पत्र आहे. तेव्हा केसेस होत्या, पोलिसांनी व्हेरीफाय करायला पाहिजे होते. मी आता ओबीसींसाठी इतके करतो आहे, हे माझ्या विरोधातील राजकीय षड्यंत्र आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -