घरमहाराष्ट्र'EWS आरक्षणामुळे मराठा समाजाला धोका होणार नाही हे सरकारनं सांगावं'

‘EWS आरक्षणामुळे मराठा समाजाला धोका होणार नाही हे सरकारनं सांगावं’

Subscribe

मराठा समाजाला EWS आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यावर आता खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका मांडली. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारनं सांगावं, असं म्हणत संभाजी राजेंनी भूमिका मांडली.

EWS आरक्षण घेतल्यानं SEBC आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी शक्यता संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. EWS आरक्षण हे केवळ मराठा समाजासाठी नसून सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चांगला निर्णय अपेक्षित आहे, संभाजीराजे म्हणाले. यावेळी त्यांनी OBC आरक्षणावरही भाष्य केलं.

- Advertisement -

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या obc समाजात भीती निर्माण झाली आहे. मात्र, आम्हाला OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी मागणी संभाजी राजेंनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत भाष्य करताना मोदींच्या भेटीची आपण आजही वाट पाहत आहोत. पण अद्याप त्यांचा वेळ मिळाला नसल्याचं म्हणत संभाजीराजेंनी नाराजीचा सुर आळवला.

चव्हाणांची हकालपट्टी केल्यानं मार्ग निघणार नाही

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि काही मराठा संघटनांनी केली आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करुन मार्ग निघणार नाही, असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -