घरमहाराष्ट्र'तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये पवारांनी काय केलं?'

‘तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये पवारांनी काय केलं?’

Subscribe

पक्षांतर केलेले हे इतिहास जमा आहेत. त्यांच्यावर चर्चा का करायची? आता फक्त उगवणाऱ्यांकडे पहायचं, असं शरद पवार यांनी सोलापुर दौऱ्यादरम्यान म्हटलं आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या या कठीण परिस्थितीला झुंज देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून या राज्यव्यापी दौऱ्याला त्यांनी सोलापुरमधून सुरुवात केली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यावरही हल्लाबोल केला. या अगोदर सोलापुरमध्ये भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न केला होता. त्याच प्रश्नाचे सडेतोड उत्तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलपुर दौऱ्यात त्यांच नाव न घेता दिलं आहे.

नक्की वाचा ‘पळपुटे कोण?’; शिवसेनेचा शरद पवारांना सवाल

- Advertisement -

‘मागील कित्येक वर्षांपासून राजकारणात शरद पवार आहेत. बरं वाईट केलं म्हणून कधी शरद पवार तुरूंगात गेला नव्हता. त्यामुळे तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये पवारांनी काय केलं’, असा टोला शरद पवारांनी लगाविला आहे. तसंच पवार यांनी पक्षांतर केलेल्यांवर टीका करताना असं म्हटलं आहे की, ‘जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांच्यावर चर्चा का करायची? जे गेले ते इतिहासजमा होतील. आता फक्त उगवणाऱ्यांकडेच पहायचं. काँग्रेसला याठिकाणी मोठा इतिहास आहे. काँग्रेसचा १९५७ मध्ये पराभव झाला होता. मात्र, सोलापुरात काँग्रेस विजयी झाला होता. परंतु काही जणांनी लाचारीच्या रस्त्यावर जाण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यांनी जनता उभं करणार नाही.’

हेही वाचाअन्याय होतोय हे उदयनराजेंना आधी कळलं नाही का? – शरद पवार

- Advertisement -

‘मी म्हातारा झालो नाही. आजपर्यंत अनेकांना याठिकाणी असलेल्या तरूणांच्या जोरावर घरचा रस्ता दाखवला आहे आणि यापुढेही दाखवायचा आहे’, असं यावेळी शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -