उदयनराजे अद्याप राष्ट्रवादी; भाजपमध्ये घेण्यास चंद्रकांतदादा ‘आशावादी’

Pune
Chandrakant Patil and Udyanraje Bhosale
उदयनराजेंना पक्षात घेण्यास चंद्रकांत पाटील उत्सुक

“मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. याबद्दल उदयनराजे यांनी मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे उदयनराजे नेमकं काय करणार आहेत याबद्दल अद्यापही तर्क वितर्क लढवले जात आहेत.

पुण्यात चंद्रकांत पाटील गणपती विसर्जनासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं की, “उदयनराजे यांच्याशी मुख्यमंत्री आणि माझा संवाद सुरू आहे. दोन दिवसांपुर्वी जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी त्यांनी मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायचे असल्याचे सांगितल्याने दोन दिवस पुढे गेले. सर्वांना सोबत घेऊन जाण्यास ते प्राधान्य देतात.

शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात जवळपास दोन तास बैठक सुरु होती. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते.

हे वाचा – मुंडे म्हणतात उदयनराजे राष्ट्रवादीतच; उदयनराजेंच मात्र ठरलंय