घरमहाराष्ट्रकांदा साठवणुकीसाठी नेदरलँड तंत्रज्ञान लागू

कांदा साठवणुकीसाठी नेदरलँड तंत्रज्ञान लागू

Subscribe

महाराष्ट्रात लवकरच होणार प्रयोग

खरीप हंगामातील कांदा साठवणुकीतील आव्हाने पाहता राज्य सरकारकडून येत्या काळात नेदरलँडच्या धर्तीवर नवीन तंत्रज्ञान लागू करण्यात येणार आहे. नेदरलँडचे वेंटीलेटर कोल्डस्टोरेजचे तंत्रज्ञान महाराष्ट्रातही कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्वावर हे तंत्रज्ञान राज्यात अमलात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू झाले आहेत. कांदा साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे.खरीप हंगामातील कांदा जास्त दिवस टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांकडून हा कांदा तातडीने बाजारात आणला जातो. परिणामी कांद्याची आवक वाढून कांद्याचा दर पडतो.

- Advertisement -

पण यंदा कांद्याच्या लागवडीतच ५० टक्के घट दिसून आली आहे. वर्ष 2019-2020च्या खरीप हंगामासाठी कांद्याचे उत्पादन क्षेत्र ०.42लाख हेक्टर होते, तर उत्पादन 5.46 लाख मे. टन इतके अपेक्षित आहे. मागील वर्षाच्या ०.96लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत त्यात 50टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसून येते. त्यामुळेच कांद्याचे उत्पादनही कमी होणार हे स्पष्ट आहे.

राज्यात एकूण उत्पादनाच्या 70ते 80 टक्के कांदा विक्री झाली असून सध्या राज्यातील शेतकरी आणि व्यापार्‍यांकडे 10 ते 15 लाख मे. टन कांदा उपलब्ध असल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

राज्यात मे 2019 पर्यंत राष्ट्रीय फलोत्पादन मिशन, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी पणन मंडळ व कृषी विभागांतर्गत विविध योजनांमध्ये 15लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेल्या 64 हजार कांदाचाळी उभारण्यात आल्या आहेत. राज्यात 5 टक्केे कांद्यावर प्रक्रिया केली जाते. त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्नही राज्य सरकारकडून सुरू आहेत. कांदा प्रक्रियेच्या छोट्या उद्योगासाठी 5 ते 10लाखांपर्यंतची गुंतवणूक अपेक्षित आहे. प्रक्रिया पदार्थांच्या दरामध्ये बर्‍यापैकी स्थिरता असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता अधिक आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -