घरमहाराष्ट्रमी लिहून देतो विधानसभा निवडणूक मुदतीपूर्वी होणार नाही - मुख्यमंत्री

मी लिहून देतो विधानसभा निवडणूक मुदतीपूर्वी होणार नाही – मुख्यमंत्री

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेण्याची राज्यसरकारने तयारी केल्याची चर्चा आज सकाळपासून सुरु होती. मात्र या बातम्या तथ्यहीन असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुका वेळेनुसार होणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहे. ‘मी लिहून देतो, विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वी होणार नाहीत’ अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच लोकसभा आणि विधानसभेचा जागावाटपाचा युतीचा फॉर्मुला ठरला आहे. त्यामुळे लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होतील का? अशी शंका उपस्थित केली जात होती. या शंकेचे निरसन खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

उद्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच सरकार बरखास्तीचा निर्णय घेणार असल्याची अफवा पसरली होती. उद्या मुख्यमंत्री राज्यपालांना भेटून सरकार बरखास्तीचे पत्र देतील. त्यानंतर विधानसभा विसर्जित होईल, अशा प्रकारच्या चर्चेला आज दिवसभर ऊत आला होता. परंतु खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सरकार बरखास्तीची व मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -