घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीत 'हे' ठरणार अपयशी; पारेकर गुरूजींचे भाकीत

लोकसभा निवडणुकीत ‘हे’ ठरणार अपयशी; पारेकर गुरूजींचे भाकीत

Subscribe

एप्रिल महिन्यात राहूची दशा असल्याने, 'हत्ती गेला आणि शेपूट राहिला' अशी अवस्था आहे. थोडक्यात अपयश येण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत जाती, धर्म समाज यावर टीका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे, असे भाकीत डोंबिवलीतील ज्याेतिषाचार्य ल. कृ . पारेकर गुरूजी यांनी 'आपलं महानगर'शी बोलताना व्यक्त केलं.

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी २ एप्रलिपासून सुरूवात होत आहे. मात्र गुढीपाडव्यापासून पंचक नक्षत्र सुरू होत आहे. त्यामुळे या पाडव्यानंतरच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त साधणार आहेत. एप्रिल महिन्यात राहूची दशा असल्याने, ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिला’ अशी अवस्था आहे. थोडक्यात अपयश येण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत जाती, धर्म समाज यावर टीका करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे, असे भाकीत डोंबिवलीतील ज्याेतिषाचार्य ल. कृ . पारेकर गुरूजी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केलं.

नेमकं काय सांगत आहे ज्योतिष शास्त्र?

निवडणूक काळात प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे साधू, संताच्या आशिर्वादासाठी धाव घेत असतात. तसेच उमेदवारी अर्ज भरतानाही आपल्या राशीनुसार कोणती योग्य वेळ आहे, असाही मुहूर्त साधत असतात. २ एप्रिल ते ९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. गुढीपाडव्यानंतर पंचक नक्षत्र सुरू होत असल्याने ७ ते ९ एप्रिल दरम्यान अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त ठरवला आहे. २९ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचे ग्रहण आणि अमावस्येचे ग्रहण असते. यंदा राहूचा प्रभाव आहे. राहू म्हणजे शेपूट! याचा विचार केल्यास, हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांचे विजय हे थोडक्यात हिरावले जाऊ शकतात. एकमेकांच्या सहकार्याशिवाय कोणालाही विजय मिळविता येणार नाही. मित्र पक्ष, घटक पक्षांचे एकमेकांचे सहकार्य आवश्यक लागणार आहे, असेच ज्योतिष शास्त्राची दिशा सांगत असल्याचे पारेकर यांनी सांगितलं. जाती, धर्म समाजावर टीका करून मन दुखावली गेल्यास त्याचा फटका त्या उमेदवाराला बसणार आहे. त्यामुळे पक्षाच्या स्टार प्रचारकांनाही हे ध्यानात ठेवावे लागणार आहे. संयम वाणीनेच यश पदरात पडणार आहे, असे पारेकर यांनी सांगितलं.

- Advertisement -
parekar guruji
पारेकर गुरुजी

उमेदवार धावले संताकडे

कोणत्याही निवडणुकीत मतदार हाच राजा असतो. तरीही उमेदवारांची साधू संत, बाबा, महाराज आणि देवस्थानांवर माथा टेकवून आशिर्वाद घेण्यासाठी धावपळ सुरु असते. यंदाही तेच पाहायला मिळत आहे. निवडणुकीत आपलाच विजय व्हावा कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी प्रत्येक उमेदवार आपआपल्या श्रध्दास्थानी माथा टेकवीत असतो. देवतांचे अनुष्ठान केले जातात. ग्रहमानानुसार प्रचाराचा मुहूर्त काढले जातात. सध्या उमेदवारांची यासाठीच धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -