घरताज्या घडामोडीचिंताजनक! पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार पार!

चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार पार!

Subscribe

सध्या पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती चिंताजनक होत आहे. दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये ५८७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

पुण्याभोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात १ हजार ६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली असून १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजार १७४वर पोहोचला असून आतापर्यंत ७८६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेत आज दिवसभरात ५८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात १५ हजार ५७९ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सहा हजार पार झाला आहे.

तसेच आज दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये ५८७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ११ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ९ शहरातील आणि २ ग्रामीण भागातील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांचा आकडा ६ हजार ६१वर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती चिंताजनक होत आहे. आज शहरात १७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ३ हजार ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु त्यांना १५ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. शनिवारी ४ जुलै रोजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.


हेही वाचा – Corona Update: मुंबईत २४ तासांत १,२८२ रुग्णांची वाढ, एकूण आकडा ८८ हजार पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -