‘देशाचा आर्थिक विकास; मात्र जनता असमाधानी’ – प्रणव मुखर्जी

नागपूर

प्रणव मुखर्जींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

 

  • भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती होत आहे मात्र लोकांना समाधानी ठेवण्यात आपण यशस्वी झालेलो नाहीत. – प्रवण मुखर्जी
  • राज्याचा विकास करा करावा यावर लक्ष दिलं पाहिजे
  • भारतात अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी आले आणि त्यांनी भारताबद्दल गौरवद्गोर काढले आहेत
  • भारतातील प्राचीन विद्यापीठांनी तब्बल ८०० वर्ष जगभरात आपला दबदबा निर्माण केला होता
  • भारत हा स्वतंत्र विचारांचा देश, देशासाठी समर्पण हीच खरी देशसेवा
  • हिंदु – मुस्लिम – सीख आणि सर्व धर्मीय एकत्र नांदू तेव्हात राष्ट्र एकसंघ राहू शकते
  • सहिष्णुता ही आपली शक्ती आहे. भारतीय ही आपली एकच ओळख आहे 
  • विभिन्न विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी त्यांच्यात संवाद असणे आवश्यक आहे

पाहा, मोहन भागवत आणि प्रणब मुखर्जींचे भाषण


 

‘हेडगेवार भारत मातेचे सुपुत्र’ – प्रणव मुखर्जी उवाच

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी नागपूर येथे उपस्थित आहेत. नागपूरात येताच सर्वप्रथम प्रणव मुखर्जींनी संघाच्या मुख्यालयाला आणि हेडगेवारांच्या एकेकाळच्या निवासस्थानाला भेट दिली.  ‘हेडगेवार हे भारत मातेचे महान सुपुत्र’ असल्याचे यावेळी मुखर्जी म्हणाले. मुखर्जी यांच्या स्वागतासाठी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. हेडगेवार यांच्याबद्दलचा अभिप्राय मुखर्जी यांनी नोंदवहीत देखील नोंदवला.


काँग्रेस नेत्यांचा मात्र विरोध…

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी ‘प्रणवदा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’ अशी खंत ट्वीटवरुन व्यक्त केली आहे. तर काँग्रेसचे वरीष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही या भेटीला विरोध केला होता. मात्र, प्रणव मुखर्जींनी विरोधाला न जुमानता ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात आवर्जून सहभाग घेतला.

काँग्रेस पक्षाने सुरुवातील मुखर्जींच्या दौऱ्याचा विरोध केला होता. नंतर मात्र संघ मुख्यालयात जाऊन मुखर्जी यांनी संघविरोधी विचार मांडावेत अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मुखर्जी संघाच्या मुख्यालयात येऊन भाषण करणार असल्यामुळे सगळ्या देशाचे लक्ष ते काय बोलणार याकडे लागले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here