घरताज्या घडामोडीCorona: पुण्यात १,१३,८१२ तर पिंपरी-चिंचवडमधील बाधितांची संख्या ५९ हजार पार

Corona: पुण्यात १,१३,८१२ तर पिंपरी-चिंचवडमधील बाधितांची संख्या ५९ हजार पार

Subscribe

पुण्यात आज दिवसभरात १ हजार ९१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ८१२ वर तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ५९ हजार ९६६ वर पोहोचली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात १ हजार ९१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ८१२ वर तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ५९ हजार ९६६ वर पोहोचली आहे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

पुण्यात ४३ रुग्णांचा मृत्यू

पुण्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना जिसत आहे. तर दुसरीकडे मृत्यूचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ८३८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९४ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड शहरात १९ जणांचा मृत्यू

तर पिंपरी-चिंचवड शहरात आज, गुरुवारी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५५७ जणांनी आज कोरोनावार मात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची ५९ हजार ९६६ वर पोहचली आहे. तर यापैकी, ४५ हजार ७३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार २२२ एवढी आहे.


हेही वाचा – अनलॉकनंतर कचऱ्याचे प्रमाण १२०० मेट्रिक टनने वाढले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -