घरमहाराष्ट्रकेंद्राचे दावे-वादे खूप; मात्र कोरोना पुढे, देश मागेच - शिवसेना

केंद्राचे दावे-वादे खूप; मात्र कोरोना पुढे, देश मागेच – शिवसेना

Subscribe

देशातील कोरोनाच्या स्थितीवर शिवसेनेने चिंता व्य्कत करत केंद्रावर टीका केली आहे. जगात करोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी कायम आहे. जगातील करोनाग्रस्त देशांमध्ये दिसणारे हे चित्र आपल्याही देशात दिसत आहे. केंद्र सरकार वादे आणि दावे तर खूप करीत आहे; पण करोना पुढे, देश मागे हेच आपल्याही देशाचे वास्तव आहे आणि त्याचे चटके जनतेला सोसावे लागत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं ‘सामना’तून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

शिवसेनेने केंद्राच्या आर्थिक पॅकेजवर देखील टीका केली आहे. जग कोरोनामुळे २५ वर्ष मागे गेलं तसा भारतही मागे गेला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. या बूस्टर डोसमुळे अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचं लक्षण तूर्त तरी दिसत नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

“आधीच गडगडलेली आपली अर्थव्यवस्था कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रसातळाला गेली आहे. जीडीपीचा दर कधी नव्हे तो उणे २३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कृषी क्षेत्र वगळता उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा विकास ढेपाळला आहे. निर्यातीतील घसरण सलग सहाव्या महिन्यात कायम राहिली आहे. आयातही खालावली आहे. त्यामुळे व्यापारी तूट कमी झाली हा दिलासा असला तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून ही परिस्थिती म्हणजे हिंदुस्थानच्या विकासाचा ‘रिव्हर्स गियर’ अशीच म्हणावी लागेल,” असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

“आपल्या देशात १२ कोटींचा रोजगार आधीच बुडाला आहे. अनेक उद्योग बंद पडले आहेत. जे सुरू आहेत तेदेखील रडतखडत सुरू आहेत. त्यात आणखी १ कोटी ७५ लाख छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे सगळे लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग असल्याने त्याचा थेट परिणाम बेरोजगारी वाढण्यात होणार आहे. साहजिकच लोकांची क्रयशक्ती आणखी कमी होईल. त्याचा प्रभाव खरेदी-विक्रीवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होईल. खासगी क्षेत्रातील खरेदी क्षमता आणि स्थिर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आकुंचन पावेल असाही एक अंदाज आहे. केंद्र सरकार वादे आणि दावे तर खूप करीत आहे; पण कोरोना पुढे, देश मागे हेच आपल्याही देशाचे वास्तव आहे आणि त्याचे चटके जनतेला सोसावे लागत आहेत,” अशी टीका शिवसेनेन केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामुळे ३८२ डॉक्टरांचा मृत्यू; केंद्राने शहीदाचा दर्जा द्यावा – IMA


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -