घरमहाराष्ट्रदुर्देवी: ड्रेनेजमध्ये अडकून २ शेतकऱ्यांचा मृत्यू

दुर्देवी: ड्रेनेजमध्ये अडकून २ शेतकऱ्यांचा मृत्यू

Subscribe

मृत शेतकऱ्यांपैकी संदीप कोते यांना वाढदिवासाच्या दिवशीच मृत्यूने कवटाळल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ड्रेनेजमध्ये गुदमरुन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. पाण्याची टंचाई असल्याने काही प्रमाणात ड्रेनेजच्या पाण्याच वापर करण्यासाठी गेलेल्या या दोन शेतकऱ्यांचा दुर्देवी अंत झाला. गंगाधर गाडेकर आणि संदीप कोते अशी मृत शेतकऱ्यांची नावं असून, या घटनेमुळे शिर्डी परिसरात सध्या शोकाकुल वातावरण आहे. याहून दुर्देवाची गोष्ट म्हणजे ज्यादिवशी ही घटना घडली त्याचदिवशी संदीप कोते यांचा वाढदिवस होता. संदीप कोते यांना वाढदिवासाच्या दिवशीच मृत्यूने कवटाळल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्यावर्षीही अशाचप्रकारे ड्रेनेज पाईपमध्ये अडकल्यामुळे चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.


वाचा: हीन दर्जाचे राजकारण करू नये– रावसाहेब दानवे

घटना सविस्तर

शिर्डीच्या कलिकानगर परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे हे दोघे शेतीसाठी ड्रेनेजचं पाणी वापरत होते. पाण्याची टंचाई भरुन काढण्यासाठी काही प्रमाणात हे ड्रेनेजच्या पाण्याचा वापर करायचे. त्यादिवशी ड्रेनेजच्या पाईपमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी संदीप आणि गंगाधर त्याठिकाणी गेले. त्यानंतर पाईप दुरुस्तीसाठी हे दोघंही ड्रेनेजमध्ये उतरले. मात्र, ड्रेनेजमधल्या विषारी वायुमुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
दरम्यान स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेत दोघांनाही ड्रेनेजमधून बाहेर काढलं आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, उपचाराआधीच दोघांचाही मृत्यू झाला.


खुशखबर: नव्या वर्षात सण उत्सव ११ दिवस आधीच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -