घरमहाराष्ट्रपंपरी-चिंचवडमध्ये सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन

पंपरी-चिंचवडमध्ये सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन

Subscribe

१२ ते १६ डिसेंबर दरम्यान प्रदर्शन, सहाशेपेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग

शेतकर्‍यांना एकाचवेळी आणि एकाचजागी आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील माहिती मिळावी या उद्देशाने भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन १२ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान मोशी येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देश, विदेशातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था सहभागी होणार आहेत. तसेच विद्यापीठ, कृषी महाविद्यालये, संशोधन संस्था, शेतक-यांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थादेखील सहभाही होणार आहेत. याबाबतची माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र मोशी येथे हे प्रदर्शन १२ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान होणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता शेतकर्‍यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

- Advertisement -

आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणा-या १०० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे.

आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोपमधील कंपन्यांचा सहभाग आहे. दालनात ५० कंपन्या असणार आहेत. भारतीय शेतक-यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे, भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाच्या पहिले तीन दिवस म्हणजेच १२ ते १४ डिसेंबर दरम्यान खुले असणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -