घरदेश-विदेशचोरपांगरा येथे नितीन राठोड यांना अखेरचा निरोप

चोरपांगरा येथे नितीन राठोड यांना अखेरचा निरोप

Subscribe

शहीद जवान नितीन राठोड या महाराष्ट्राच्या वीरपुत्रावर लोणार येथील चोरपांगरामध्ये अंत्यसंस्कार पार पडले.

बुलडाणा जिल्ह्यावर दुहेरी आघात झाला आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यामध्ये केंद्रिय राखीव पोलीस दलाचे ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. यामधील महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवाला औरंगाबाद मध्ये मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव रस्त्याच्या मार्गाने  त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. पार्थिव लोणार येथील चोरपांगरा या मूळगावी दाखल करण्यात आले. शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाल्यावर सर्वप्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यांचे पार्थिव पाहून त्यांच्या आईचा शोक अनावर झाला. शहीद जवान नितीन राठोड हे ज्या शाळेत शिकले त्या शाळेच्या मैदानामध्येच त्यांचे पार्थिव नागरिकांसाठी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

आपल्या ४० जवानांना मारले, तुम्ही ४०० दहशतवाद्यांचा खात्मा करा

लोणार येथील नागरिकांमध्ये एकीकडे तीव्र संताप तर दुसरीकडे तेवढ्याच प्रमाणात शोकाकुळ  वातावरण पसरले होते. त्यांच्या गावात शहीद जवान नितीन राठोड यांना   नितीन दादा असे संबोधले जायचे. तिथल्या थोरामोठ्यांचा एकच नारा होता की, ‘रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला पाहिजे, त्यांनी आपल्या ४० जवानांना मारले, तुम्ही ४०० किंवा त्यापेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करा’, अशा प्रकारचा तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी नागरिक उपस्थित होते. ‘बाबा जसे देशासाठी शहीद झाले, तसाच मी ही देशासाठी शहीद व्हायला तयार आहे’, असे शहीद जवान नितीन राठोड यांच्या ८ वर्षाच्या मुलाचे हे कोवळे बोल मन हेलावून टाकणारे होते. शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शहीद जवान नितीन यांच्या मुलाच्या हातून अंतिम विधी करत त्यांमा मुखअग्नी ही देण्यात आला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -