अरेच्च्या! पोलिसाच्या घरातच चोरी

लातूरमध्ये पोलिसाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Latur
फाईल फोटो

एकीकडे शहर सुरक्षित राहावं यासाठी पोलीस डोळ्यात तेल टाकून पहारा देत असतात, पण दुसरीकडे पोलिसांचेच घर सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लातूर शहरामध्ये एका चोरट्यांने चक्क पोलिसाचे घर फोडण्याची हिंमत दाखवली आहे. यावरुन चोरांची मजल वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसाचे बंद घर फोडून तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाचा – चोरीच्या संशयावरुन तरुणाची केली हत्या!


नेमके काय घडले?

लातूर येथील कातपूररोड येथे राहणाऱ्या महेश मुरलीधर तांबरे यांच्या राहत्या घरी भरदिवसा घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २६ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान घडल्याचे उघडकीस आले आहे. २६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांने पोबारा केला आहे. चोरट्यांने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या चोरट्याने घरातील कपाटाचे लॉक तोडून रोख रक्कम ६० हजार रुपये, सोन्याचे पाटल्या, नेकलेस, झुमके, अंगठ्या, सरपाळे, मंगळसुत्र असा सुमारे ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.


वाचा – १३ लाख रुपयांचं घड्याळ चोरी ; चोर जेरबंद


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here